जळगाव समाचार डेस्क | २८ जानेवारी २०२५
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. राज्यात फेब्रुवारी २०२५ नंतर १० हजार पोलिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी सध्या रिक्त पदांची माहिती गोळा केली जात आहे.
डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवण्यात आली आहे. ही भरती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे बनले आहे. मागीलवेळी १७ हजार पदांसाठी १८ लाख अर्ज आले होते. यावेळीही मोठ्या प्रमाणावर अर्ज येण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी गृह विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागविली आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल. त्यानुसार काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरु होईल.
– राजकुमार व्हटकर, अपर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके

![]()




