जळगाव समाचार डेस्क। १० ऑगस्ट २०२४
ब्राझीलमधील साओ पाउलो भागात विन्हेडो येथे एक प्रवासी विमान कोसळले. या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अग्निशमन दलाने विन्हेदो शहरात विमान क्रॅश झाल्याची आणि विमानाच्या समोरून धूर येत असल्याची पुष्टी केली . एअरलाइन VoePass ने एका निवेदनात पुष्टी केली की साओ पाउलोच्या ग्वारुलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमान क्रॅश झाले. विमानात 58 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. अपघात कशामुळे झाला हे निवेदनात सांगण्यात आलेले नाही.
व्हिडीओ
BREAKING: Voepass Flight 2283, a large passenger plane, crashes in Vinhedo, Brazil pic.twitter.com/wmpJLVYbB3
— BNO News (@BNONews) August 9, 2024
विमान अपघातामुळे अनेक घरांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. X वरील व्हिडिओमध्ये त्यांनी लोकांना एक मिनिट मौन पाळण्यास सांगितले आहे.