जळगाव समाचार डेस्क;
जळगाव(Jalgaon) शहरालगत असणाऱ्या पिंप्राळा येथे आषाढी एकदाशिनिमिताने रथोत्सव साजरा केला जातो. या रथोत्सवाला तब्बल 148 वर्षांची परंपरा आहे. मात्र आज या रथाला आज मोठा अपघात होताना थोडक्यात बचावला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळा येथे गेली 148 हा रथोत्सव साजरा होतो. मात्र, आज रथ ओढतांना तीव्र उतारावर रथाच्या वेगाचे नियंत्रण न राखता आल्याने रथाचे चाक हे गटारी मध्ये अडकले आणि रथ इमारतीवर जाऊन आढळला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी नाही.
रथाला काढतांना भाविकांची एकता दिसून आली.
गटारीमध्ये अडकलेल्या रथाची चाकं काढण्यासाठी भाविकांनी आपल्या बलदंड बहुपाशाचे जोर दाखवत रथाला काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या मदतीने आता जेसीबीने रथ बाहेर काढण्यात आला.