तालुका वकील संघ व विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम…

 

पारोळा प्रतिनिधी, विक्रम लालवाणी

येथील न्यायालयात दि. ०६/०७/२०२४ रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम व विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्री. एम.एस.काझी हे होते.
पारोळा वकील संघाचे ॲड. विद्या लोहार यांनी नालसा योजना २०१५ यात लहान मुलांसाठी अनुकूल कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण, ॲड. विजय पवार यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिन (१७ जुलै ), ॲड. पुनम पाटील यांनी बाल न्याय अधिनियम २०१५ यात मुलांची काळजी व संरक्षण व बालकांचे हक्क, ॲड. स्वाती शिंदे यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ, ॲड. स्मीता मोरे यांनी जागतीक लोकसंख्या दिन (११ जुलै ), ॲड. विशाल शिंदे यांनी लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच ॲड अतुल मोरे यांनी मध्यस्थी जनजागृती यथोचित माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश श्री. एम.एस.काझी यांनी वरिल विषयांबाबत सर्वसमावेशक अशी माहिती देवुन उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास साधारण ५० ते ६० नागरिक उपस्थित होते. तसेच सरकारी अभियोक्ता पी.बी. मगर, पारोळा वकिल संघाचे सचिव ॲड. जी.सी.मरसाळे तसेच तालुका वकील संघाचे सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे ॲड. गौरी कासार यांनी सुत्रसंचालन केले व ॲड. ज्ञानेश्वर पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तालुका विधी सेवा समितीचे वरीष्ठ सहाय्यक विलास ठाकुर व कनिष्ठ सहाय्यक मधुसुदन बागड, चैत्राम पवार व समाधान धनगर, शिपाई तसेच पोलीस कर्मचारी अनिल मोरे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here