पारोळ्यात पर्यावरण दूतांच्या वतीने वृक्षारोपण…

 

पारोळा, प्रतिनिधी विक्रम लालवाणी;

पारोळा नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रसाशक किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.०६ जुलै २०२४ रोजी पर्यावरण दुतांच्या वतीने पारोळ्यात वृक्षारोपण करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा नगरपरिषदेच्या वतीने नियुक्त पर्यावरण दूत डॉ.संजय भावसार, डॉ. प्रदिप औजेकर, राहुल निकम यांच्या वतीने पारोळा शहरातील डी.बी.सोनार नगर येथे वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी पर्यावरण दूतांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक असल्याने प्रत्येकांने वृक्षारोपण करणे व वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे, म्हणून पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन केले .
याप्रसंगी नगरपरिषदेचे माझी वसुंधरा शहर समन्वयक अक्षय सोनवणे,सफाई कर्मचारी आरिफ गुलाब शेख, प्रदिप रीले, अल्ताफ शेख, सिकंदर मुक्तार शेख आदी अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here