पारोळ्यात 36 वर्षीय वायरमनची गळफास घेऊन आत्महत्या…

(विक्रम लालवाणी) प्रतिनिध पारोळा

पारोळ्यात मराठे गल्लीतील रहिवासी ३६वर्षीय वायरमन असलेल्या तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील मराठे गल्लीतील रहिवासी किरण (बंटी) प्रदिप सोनार (३६) यांनी आपल्या राहत्या घराच्या हॉल मध्ये रात्री 1 वाजेच्या सुमारास झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सुनील भालेराव यांच्या खबरीवरून पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,मुलगा, मुलगी, तसेच काका काकू असा परिवार आहे. त्यांच्यावर पारोळ्यात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here