टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

 

(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा

पारोळा टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे थोर समाज सुधारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे व मनुष्य स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही असे मानणारे लोकमान्य टिळक तसेच समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण असे हे अण्णाभाऊ साठे अशाप्रकारे विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रविंद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य. श्रीनिवास राव, अजीम शेख, कविता सूर्यवंशी, विश्वास पाटील, विभाग प्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील, श्रीकांत खैरनार, सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here