(विक्रम लालवाणी) पारोळा प्रतिनिधी
शनीमंदिराजवळ गुलाब तुकाराम पाटील यांना विषारी नाग आढळून आल्यावर त्यांनी सर्पाला न मारता, त्वरित जीवरक्षक चॅरिटेबल संस्थेच्या सर्पमित्र भूषण पाटील आणि प्रविण जगताप यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन नागाची सुरक्षितपणे पाहणी करून त्याला पकडले.
नागाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सर्पमित्रांनी नागासंबंधीची सविस्तर माहिती देत नागरिकांच्या मनातील सापाविषयीची भीती दूर केली. त्यानंतर वनपाल श्रीमती गायकवाड आणि वनरक्षक सुवर्णा कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले, यामुळे नागाला जीवनदान मिळाले.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांत साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सर्पमित्रांनी साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून जनजागृती केली.
संपर्क:
भूषण पाटील: 9561954900
प्रविण जगताप: 9325440744
निंबा मराठे: 9420604075
साप दिसल्यास त्वरित या सर्पमित्रांशी संपर्क साधावा आणि सापाला जीवदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.