जळगाव समाचार | १५ नोव्हेंबर २०२५
पारोळा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम राबवली. पारोळा पोलीस ठाण्यात दाखल गु.र. नं. ३०७/२०२४ भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत नोंदवलेल्या चोरी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनोज पाडुरंग गायकवाड (रा. लामकाणी, ता. धुळे) यास अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे अनेक दिवसांच्या देखरेखीनंतर त्याला ताब्यात घेतण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने एक होंडा शाईन व दोन युनिकॉन अशा तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. सर्व तिन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या असून या चोरीचे गुन्हे पारोळा पोलीस स्टेशन व जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत.
जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मा. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानीय गुन्हे शाखा) यांनी पोउनि. जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. या कारवाईत पोह. विष्णु बिऱ्हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील आणि चालक दिपक चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या यशस्वी ऑपरेशनमुळे परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

![]()




