(विक्रम लालवाणी), पारोळा प्रतिनिधी
पारोळा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारोळा तालुका नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील विश्रामगृहात मराठी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. हि बैठक खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, विभागीय सचिव बाळासाहेब पाटील, विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भुपेंद्र मराठे, जिल्हा सदस्य बाळुभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी पारोळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणीची निवड करून यात नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कार्यकारणी खालील प्रमाणे
तालुकाध्यक्ष – अभय पाटील, उपाध्यक्ष – संजय पाटील, सचिव – अशोककुमार लालवाणी, कार्याध्यक्ष – रमेशकुमार जैन, शहराध्यक्ष – राकेश शिंदे, सदस्य – दिलीप सोनार, योगेश पाटील, बापू वाडीले, प्रतीक मराठे, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, दीपक भावसार, मच्छिंद्र दगा शेलार, जितेंद्र वानखेडे, सुनील महाजन.
संपूर्ण नवीन कार्यकारिणीचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी बोलताना विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी सांगितले की, हि पत्रकार संघटना फक्त फोटो सेशन किंवा तात्पुरते कार्यक्रम घेणे या पर्यंत सिमित न राहता, राज्यासह देशातील पत्रकार बांधवांसाठी ठोस कार्य करीत आहे. आता पर्यंत या संघटनेने माध्यमातून अनेक उपक्रम पत्रकारांसाठी राबविण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने दर वर्षी पत्रकारांच्या संरक्षणासाठी हेल्मेट वाटप, रेनकोट वाटप, पत्रकारांच्या पाल्यांना मोठ्या प्रमाणात शालेयउपयोगी साहित्य वाटप, पत्रकारांना विमा कवच असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच भविष्यात देखील हि संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहुन शासन दरबारी पत्रकारांसाठी काय करता येईल ते करण्याचे काम हि संघटना सदैव करत राहाणार आहे. म्हणून पत्रकारांनी संघटनेत एक निष्ठ होऊन काम करण्याची गरज आहे. याप्रसंगी सुत्रसंचालन सचिव अशोककुमार लालवाणी यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी मानले.