जळगाव समाचार
पारोळा येथील ज्येष्ठ पत्रकार अशोककुमार लालवाणी यांचे वडील नारायणदास थावरदास लालवाणी (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते पारोळ्यातील जळगाव समाचार चे प्रतिनिधी विक्रम लालवाणी यांचे आजोबा होते. त्यांच्या निधनाने लालवाणी परिवारावर शोककळा पसरली आहे.
नारायणदास लालवाणी यांची अंत्ययात्रा आज दुपारी पाच वाजता बहिरम गल्लीतील गजानन मंदिराजवळून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.