पारोळ्यात तीन मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यू ; दोघे सख्खे भाऊ तर एक आते भाऊ…

 

(विक्रम लालवाणी), प्रतिनिधी, पारोळा| ३ ऑगस्ट २०२४

पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या पाच अल्पवयीन मुलांना धरणात पोहणे जीवावर बेतले आहे. मोह न आवरल्याने पोहण्यासाठी गेलेल्या पाच बालकांपैकी तीन बालकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोन जण पाण्यातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले आहे. हि घटना दि. ३ रोजी दुपारी ३,३० वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ व एक त्यांचा मालेगाव येथील आत्तेभाऊ आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पारोळ्यातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच अल्पवयीन मुलं मोहम्मद एजाज मोहम्मद मोमीन (12), मोहम्मद हसन लियाज मोहम्मद मोमीन (16), आश्रम पीर मोहम्मद ( 9), इब्राहिम शेख अमीर (14) सर्व राहणार बडा मोहल्ला पारोळा ता पारोळा, आवेश रजा मोहम्मद जैनोद्दीन रा मालेगाव जि नाशिक. हे पाचही जण दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरातून पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (16) इजाज रजा न्याज मोहम्मद (14) रा बडा मोहल्ला पारोळा, आवेश रजा शेख मोहम्मद (17) मालेगाव जि नाशिक हे तीघे धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले तर दोघे जण धरणाच्या कमी पाण्यात उतरले.विशेष म्हणजे पाचही जणांना कोणालाही पोहता येत नव्हते. रंतु फक्त किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघं तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही,त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले.तर दोघे कमी पाण्यात उभे असलेले आश्रम पीर मोहम्मद ( 9),इब्राहिम शेख अमीर (14)यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता,ते वाचवू शकले नाही. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली,घडलेल्या घटनेची आप- बीती सांगितल्यानंतर येथील नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले.मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला होता. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालय येथे आणले असता त्यांच्यावर पारोळा कुटीर रुग्णालय येथे डॉ प्रशांत रनाडे, डॉ सुनील पारोचे, डॉ गिरीश जोशी,मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले.
रुग्णालयात गर्दी
दरम्यान बडा मोहल्यातील तीघाचा भोकरबारी धरणात बुडून मृत्यु झाल्याची घटना शहरात वाऱ्या सारखी पसरल्या नंतर त्यांचे नातेवाईक व मोहल्यातील नागरीकांनी एकच गर्दी केली होती .
घटना स्थळी यांनी दिल्या भेटी…
घटनेची माहिती मिळताच माजी खा .ए .टी . पाटील , भाजपाचे क्षेत्र प्रमुख गोविंद शिरोळे, राष्ट्रवादी ( अजितदादा गटाचे)डॉ संभाजीराजे पाटील ,जि .प सदस्य रोहन पवार तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदनवाडकर पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरदीप वसावे बी पी गीते, तलाठी निशिकांत पाटील, प्रशांत निकम पोलीस सुनील हटकर होते तर बचाव कार्यात पंकज पाटील प्रवीण पाटील , गौतम जावळे, करण लोहार, रवी कंडारे, विजय महाजन, अंकित राजपूत होते .
या तीन जणांमधून हसन, एजाज हे दोघे सख्खे भावंड होते,व आवेश हा त्यांचा आत्ते भाऊ होता.पारोळा शहरात दि. 31 रोजी मिश्किल शहा बाबांचा संदल असल्याने त्यानिमित्त तो पारोळा येथे आला होता.सर्व भोकरबारी येथील पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते.त्यानंतर ते धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले हसन हा इयत्ता बारावी मध्ये धरणगाव येथील उर्दू शाळेत शिकत होता,तर एजाज आठवी नंतर शाळा सोडली होती, तसेच मालेगाव येथील भावेशनेही शाळा सोडून वडिलांच्या कामात हातभार लावत होता हसन, त्यांच्या नातेवाईक मुंबई येथे दवाखान्यात आजारी असल्याने परिवारातील सर्व जेष्ठ हे मुंबई येथे गेले होते घरी फक्त महिला होत्या,घटनेचे वृत्त कळताच परिवारा ने एकच हंबरडा फोडला संपूर्ण परिसर सुन्न झालेल्या अवस्थेत होता इजाज, हसन यांची घरची परिस्थिती हालाखीची आहे त्यांचे वडील हे साड्यां विक्रीचा व्यवसाय करून आपल्या घरचा उदरनिर्वाह भगवातात तरी त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी समाजा तर्फे केली जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here