एरंडोल-पारोळा विधानसभेसाठी काँग्रेसकडून पिरनकुमार अनुष्ठान यांच्या नावाचा ठराव

पारोळा, जळगाव समाचार डेस्क;

सध्या राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत प्रत्येक पक्ष आप आपल्या उमेदवारांची चाचपणी करीत आहेत याचाच एक भाग म्हणून पारोळा येथील विश्रामगृहात काँग्रेस पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा अशी मागणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की,
पारोळा तालुका काँग्रेस कमिटीची येत्या विधानसभा २०२४ निवडणूकीबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार चाचपणी करण्यासाठी पक्षाचे निरिक्षक संदिप घोरपडे यांच्या उपस्थितीत इच्छूकांची नांवे जाणून घेण्यासाठी पारोळ्यात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षस्थानी पारोळा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान हे होते.
या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांच्या नावाचा एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी असा ठराव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष रामराव राजाराम पाटील(राजवड) यांनी केले. प्रास्ताविक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य विजय महाजन यांनी केले,पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघा बद्दल संपूर्ण बुथ निहाय चर्चा करण्यात आली.
संदिप घोरपडे यांनी हजर असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी विचारविनिमय करून पारोळा तालुका काँग्रेस कमिटी ने केलेल्यां उमेदवारांच्या ठरावची नक्कल घेऊन आपला अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले. यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामराव राजाराम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य विजय महाजन, काँग्रेस चे जुने सहकारी कृष्णकांत विसावे, गोकुळ पाटील, भगवान भास्कर पवार, ज्ञानेश्वर अशोक फटकाळ, यशवंत रविंद्र पाटील, बापूसाहेब वाडीले,किरण आठवले, एरंडोल येथील अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष कलीम शेख हुसेन, नामदेव महाजन आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here