२७ जुलै रोजी पारोळा न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन…


(विक्रम लालवाणी), प्रतिनिधी पारोळा

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे निर्देशान्वये तालुका विधी सेवा समिती, पारोळा व वकील संघ, पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय, पारोळ्याचे प्रांगणात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होऊन त्यांची न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे, तसेच दाखल पूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन न्या. एम. एस. काझी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, पारोळा तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पारोळा यांनी केले आहे.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित दिवाणी दावे, दाखल पूर्व प्रकरणे, बॅंक कर्ज प्रकरणे, धनादेशाचे प्रकरणे, ग्रामपंचायत / नगरपरिषदची थकबाकी प्रकरणे, घरगुती कौटुंबिक वाद, पोटगी प्रकरणे आणि तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. तरी सर्व संबंधितांनी सदर राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावित. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी दि.२७जुलै २०२४ रोजी न्यायालयात उपस्थित राहून राष्ट्रीय लोक अदालतचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here