न्यू आदर्श गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नामदेव महाजन, सचिवपदी अशोक लालवाणी यांची निवड

(विक्रम लालवाणी), पारोळा प्रतिनिधी

शहरातील रथ चौकातील नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या न्यू आदर्श गणेश मंडळाची रथचौकातील जनार्दन मंदिराच्या सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली याप्रसंगी सन २०२४ साठीच्या गणेशोत्सवाची मंडळाच्या जेष्ठ सदस्यांच्या सल्ल्यानुसार कार्यकारिणी
ची घोषणा करण्यात आली.
ती याप्रमाणे –
मंडळाचे अध्यक्ष नामदेव महाजन, उपाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष विनोद बागड, खजिनदार अमोल अमृतकर, सचिव पत्रकार अशोककुमार लालवाणी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सल्लागार किरण वाणी, संजय बुधा पाटील , राजेंद्र पाखले, पत्रकार रमेशकुमार जैन , योगेश पाटील , निलेश कुंभार, अमित पाटील, कैलास पाटील, सोनू चौधरी, जगदीश शर्मा , योगेश वाणी, समिर वैद्य , दिपक पाटील, प्रसाद पुराणिक,डि डी वाणी, सुदर्शन कोळी,मिरज श्रीवास्तव , अमित जैन , राजेंद्र अमृतकर , राजेंद्र बोरसे दीपक कायस्थ , पंकज महाजन बाळू शिंपी गजानन कायस्थ , पप्पु कायस्थ , छोटू अमृतकर , प्रतिक अमृतकर , प्रसाद अमृतकर , राहुल चौधरी , शुभम वाणी, आदि उपस्थित होते.
या गणेश मंडळाची ख्याती म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रचलित आहे. तसेच मागील ४५ वर्षापासून न्यू आदर्श गणेश मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे . या मंडळाची मूर्ती हि नवसाला पावणारी असल्यामुळे दररोज रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील व शहरातील विविध पक्षांचे राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित व्यापारी आदींसह भाविक आरती करुन आपली मनोकामना बाप्पा पुढे व्यक्त करतात. तसेच मनोकामना पुर्ण झाल्यावर या गणरायापुढे नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल नवस फेडत असल्याची प्रथा असल्याची माहिती गणेश मंडळातील जेष्ठ सदस्यांनी दिली.

न्यू आदर्श गणेश मंडळाने मागील ४५ वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here