विक्रम लालवाणी, पारोळा प्रतिनिधी
पारोळ्यात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक शाम लता के नाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २८ सप्टेंबर रोजी बालाजी मंदिराच्या आवारात रात्री ८ वाजता होणार आहे.
संगीत साक्षरता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ऑर्केस्ट्रा कोकिळा प्रस्तुत या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सौ. वैशाली शिंदे आपल्या सुमधुर आवाजात लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी आणि मराठी गाण्यांचा नजराणा सादर करणार आहेत. या कार्यक्रमात सुमधुर गीते आणि नृत्याचेही सादरीकरण होणार आहे.
पत्रकार परिषदेत संजय जावरस यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आणि या सांगीतिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.