(विक्रम लालवाणी) पारोळा प्रतिनिधी
पारोळा तालुक्यातील सांगवी येथील गुरुमाऊली सेवानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ संभाजीराजे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील सांगवी येथील श्री दादाजी धुनीवाले दरबार येथे गुरू माऊली सेवानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारोळा येथील सांई हाॅस्पिटल चे संचालक डॉ संभाजीराजे आर पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. याप्रसंगी संस्थान डॉ संभाजीराजे पाटील यांचा संस्थानाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना डॉ संभाजीराजे पाटील यांनी सांगितले की, रक्तदान शिबीरा सारखे समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन व अतिशय नयनरम्य परिसरात असलेल हे देवस्थान आणि आयोजकांनी केलेल्या कार्यक्रमाचे नियोजन हे प्रशंसनीय आहे. तसेच प्रसन्न मूर्ती आणि सुरु असलेल्या होम हवन आणि पंचक्रोशीतील जमलेल्या हजारो भक्ताच्या वाणीतील जयघोष आत्मिक समाधान देऊन जातो. असे गौरवोद्गार यावेळी डॉ संभाजीराजे पाटील यांनी काढले. तसेच उपस्थित भाविक भक्तांचे आभार मानले.