(विक्रम लालवाणी) प्रतिनिधी पारोळा
पारोळा तालुक्यातील वाघरे येथील शेतकऱ्याने स्टेट बँकेतून ४ लाख ८० हजार रुपायचे सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. त्यातील तीन लाख रुपये आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवले होते. या घटनेकडे अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत डिक्कीतून तीन लाख रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १८ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वाघरे ता. पारोळा येथील शेतकरी प्रकाश विठ्ठल पाटील यांनी शेती कामासाठी आपल्याकडील सोने पारोळा येथील भारतीय स्टेट बँकेत गहाण ठेवून त्या पोटी ४ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातुन १ लाख ८० हजाराची रक्कम आपल्या जवळ ठेवत उर्वरीत रक्कम आपल्या जवळील स्कुटी क्रं एम एच 19 डी वाय 0396 डिक्कीत ठेवली होती. स्टेट बँकेतुन स्कुटीने ते व्यकटेश नगर येथे आपल्या नातेवाईकाडे काही कामानिमित्त गेले असता स्कुटी अंगणात लावून घरात गेले. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळात ठेवून त्याठिकाणी पैशासह गाडी घेऊन पसार झाले, त्यानंतर या चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या राणी लक्ष्मीबाई नगर येथे गाडीच्या डिक्कीतुन तीन लाख रुपये काढून गाडी त्याच ठिकाणी लाऊन पसार झाले.
याबाबत आजुबाजुचे सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. यावेळी स्टेट बँक परिसरातूनच हे चोरटे या वृद्ध दापंत्यावर पाळत ठेवून होते. हे वृद्ध ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणी अज्ञात तीन इसम त्यांच्या मागावर होते. दरम्यान त्यांनी सांडी साधून त्यांच्या नातेवाईकांच्या अंगणात लावलेली गाडी घेऊन ते पसार झाले. या सर्व घटना शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या सी सी टी टीव्हीत कैद झाल्या आहेत, सीसीटीव्हीत चोर कैद झाले असल्याने पोलिसांसमोर चोरटे पकडण्याचे आव्हान आहे. याबाबत पोलिसात रात्री उशीरा पर्यंत पारोळा पोलिसात गुन्ह्याची नोंद सुरू होती.