पारोळा, जळगाव समाचार वृत्त;
पारोळा येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल जिवंत काडतूस आढळून आले आहे.
पिस्तूल, काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईलसह त्यांच्याकडून एकुण ६५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, त्यांच्यावर पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पारोळा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २२ जून रोजी रात्री ११ वाजता पारोळा शहरातील धरणगाव बायपास जवळ सापळा रचून एक दुचाकी अडविली. यावेळी त्यांची विचारपूस करता त्यांची उत्तरं ही उडवाउडवीची जाणवल्याने पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी 2 दुचाकीस्वारांकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस मिळून आले. शामकांत एकनाथ पाटील आणि भिकन तुकाराम पाटील दोन्ही रा. पारोळा अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर आर्म ॲक्ट नुसार पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

![]()




