पारोळ्यात कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

 

जळगाव समाचार| पारोळा, प्रतिनिधी (विक्रम लालवाणी)

पारोळा येथील एका दुचाकीस्वार तरुणाचा महामार्गावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रशांत (गोलु) नागदेव (वय ३४), हे रात्री १० वाजेच्या सुमारास प्लेटिना मोटारसायकल (क्र. एमएच १९ डी डब्ल्यू ८२७४) वरून घराकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात पारोळ्यातील गणेश भोजनालयासमोर महामार्गावर घडला. लक्ष्मी मोबाईलचे संचालक राजकुमार नागदेव यांचे लहान चिरंजीव प्रशांत नागदेव, हे रोजच्या प्रमाणे घराकडे निघाले होते. मात्र, अचानक येऊन धडक देणाऱ्या कार (क्र. एमएच ५४ बी ०६७२) च्या भीषण धडकेमुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेबाबत पारोळा पोलीस ठाण्यात प्रशांतचे मोठे बंधू सन्नी नागदेव यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात कार चालकाने आपली कार अपघातानंतर घटनास्थळी सोडून पळ काढला. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here