जळगाव-पारोळा तालुक्यातील आंबा पिंपरी येथे अवैधरित्या गांजाची शेती स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलिसांनी उध्वस्त केले असून सुमारे 12 लाखांचा 120 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की आंबा पिंपरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पारोळा ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी अरुण कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग व सावळे करीत आहे. दरम्यान आरोपी हा फरार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.