जळगाव समाचार डेस्क| ३० जुलै २०२४
भारतासाठी ऑलिम्पिक (Paris Olympic) मध्ये आज दुसरे कांस्यपदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी ऑलिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशी भारतासाठी हे पदक जिंकले आहेत. हे दोन्ही खेळाडू १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होते. जिथे त्यांनी कोरियाच्या मिश्र संघाचा पराभव केला. माणू भाकरने इतिहास रचला असून, मनू भाकरच्या नावावर आता २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली आहेत.