पालकमंत्र्यांनी घेतली रेल्वे दुर्घटनेतील जखमींची भेट…

जळगाव समाचार डेस्क | २५ जानेवारी २०२५

परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची आज गोदावरी हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांनी जखमींची प्रकृती विचारून त्यांच्यावर होत असलेल्या उपचाराची माहिती घेतली.

यावेळी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंखे व वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. त्यांनी जखमींच्या प्रकृतीविषयी मंत्री पाटील यांना सविस्तर माहिती दिली. मंत्री पाटील यांनी या दुर्घटनेतील सर्व जखमींना योग्य तो वैद्यकीय उपचार सुरु असल्याची खात्री करून घेतली. जखमींच्या नातेवाईकांशीही चर्चा केली.

या भेटीदरम्यान मंत्री पाटील यांच्यासोबत रुग्णालय प्रशासनाचे अधिकारी, तसेच संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर दाखवलेल्या तत्परतेचाही उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here