रयतेचे राज्य शिवरायांचं – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशतर्फे स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत रयतेचे राज्य शिवरायांचं या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व व रिल्स स्पर्धा घेतली जाणार आहे.

ही स्पर्धा १४ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असून २५ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत स्पर्धकांना सहभाग घेता येईल. विजेत्यांसाठी रोख रक्कम व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष निशांत चौधरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here