OBC प्रवर्गासाठी शासकीय योजनांची मेजवानी; १ ते ५० लाखांपर्यंत कर्जाची संधी!

 

जळगाव समाचार | १७ ऑक्टोबर २०२५

राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील दुर्बल व उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संजय गोविंद तायडे यांनी केले आहे.

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे धोरण राबविले जात असून, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाकडून जळगाव जिल्ह्यासाठी भौतिक व आर्थिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यालयामार्फत सध्या सात प्रमुख योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत —
1. २० टक्के बीजभांडवल योजना
2. थेट कर्ज योजना (रु. १ लाखांपर्यंत)
3. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (बँकेकडून रु. १५ लाखांपर्यंत)
4. गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १५ लाख ते ५० लाखांपर्यंत)
5. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. १५ लाख ते २० लाखांपर्यंत)
6. महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
7. कौशल्य विकास योजना

या सर्व योजनांची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांनी बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिर, महाबळ कॉलनी, जळगाव येथील इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन तायडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here