नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;– साहित्याच्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून दक्षिण कोरियन लेखिका हान कांग यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 1993 पासून त्यांनी कोरियन पत्रिका साहित्य आणि समाज मधून त्यांनी आपल्या करियरला सुरुवात केली. दक्षिण कोरियन लेखिका हान कांग यांना हा पुरस्कार देण्यात आला. हान कांग यांना त्यांच्या “इंटेन्स पोएटिक प्रोज” या रचनेसाठी 2024 या वर्षातील साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील असुरक्षितता, वेदना आणि त्याचे परिणाम प्रभावीपणे मांडले जातात. हान कांग यांची साहित्यिक शैली वाचकांना अंतर्मुख करणारी असून ती मानवी अस्तित्वाच्या वेदना तसेच नाजुकतेवर प्रकाश टाकते.
नोबेल पुरस्काराने सन्मानित हान कांग यांचा जन्म दक्षिण कोरियातील ग्वांगजूमध्ये 1970 मध्ये झाला. त्यांचे वडील देखील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. लेखनासोबतच हान कांग यांना कला आणि संगीताची आवड आहे. 1993 मध्ये साहित्य आणि समाज या कोरियन पत्रिकेत अनेक कविता प्रकाशित करत त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. तर 1995 मध्ये त्यांनी ‘लव्ह ऑफ येओसु’ (कोरियन भाषा) हा लघु कथासंग्रह लिहिला. त्यानंतर त्यांनी कादंबरी आणि लघुकथांचे लिखाण केले. त्यांच्या पुस्तक संपदेत द व्हेजिटेरियन, द व्हाईट बुक, ह्युमन ऍक्ट्स आणि ग्रीक लेसन्स यांचा सहभाग आहे.