धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा; प्रकृती स्थिर असल्याची सनी देओलच्या टीमकडून अधिकृत हेल्थ अपडेट…

 

जळगाव समाचार | ११ नोव्हेंबर २०२५

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांना अॅडमिट केले.

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्यानंतर सनी देओल यांच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,
“धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते डॉक्टरांच्या सततच्या निगरानीखाली आहेत. पुढील अपडेट्स उपलब्ध होताच माध्यमांसोबत शेअर केले जातील. कृपया त्यांच्या आरोग्याबाबत अफवा पसरवू नयेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी आणि कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा.”

(अनावधानाने जळगाव समाचार कडूनही त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्यासाठी जळगाव समाचारच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here