Sunday, December 22, 2024
Homeजळगाव ग्रामीणनेपाळ बस दुर्घटना: सात जखमी नागरिक सुखरूप मुंबईत पोहोचले

नेपाळ बस दुर्घटना: सात जखमी नागरिक सुखरूप मुंबईत पोहोचले

जळगाव समाचार डेस्क| २७ ऑगस्ट २०२४

 

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जखमी झालेले सात भारतीय नागरिक, उपचारानंतर दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर आज विमानाद्वारे काठमांडूहून मुंबईत सुखरूप पोहोचले. या अपघातानंतर त्यांच्यावर नेपाळमध्ये उपचार सुरू होते, आणि त्यांना तातडीने मदत मिळाली.

दुर्घटनेतील उर्वरित गंभीर जखमी पर्यटकांवर अद्याप उपचार सुरू असून, त्यांची काळजी भारतीय दूतावास व नेपाळ सरकार घेत आहेत. सर्व जखमींची लवकरच मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सर्व जखमींच्या सुरक्षिततेची खात्री दिली आहे आणि नेपाळ सरकार व भारतीय दूतावासाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page