लातूर, जळगाव समाचार डेस्क;
NEET घोटाळा प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रात सापडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात शनिवारी एटीएसच्या पथकाने मोठी कारवाई करत लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती र आली आहे.
एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या NEET परीक्षेत देशभरातील अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कडक कारवाई करतांना अनेक ठिकाणी तपास यंत्रणा आपल्यापरीने तपास करत असून अनेक संशयितांन ताब्यात घेतले जात आहे. दरम्यान लातूर येथून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही शिक्षकांची सध्या कसून चौकशी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET) पेपरफुटी प्रकरणी नांदेडच्या एटीएस पथकानं लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही लातूर येथे खाजगी कोचिंग क्लासेस चालवत होते अशी माहिती आहे.