जळगाव समाचार डेस्क;
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनानुसार, जळगाव महानगर महिला आघाडीतर्फे आज शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. (Jalgaon)
महानगर अध्यक्षा मीनल पाटील यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मा. जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना पाटील, श्रीमती सोनाली देऊलकर,सौ अर्चना कदम या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी जळगाव येथे रेल्वे कॉलनी, प्रभात चौक, लेक सिटी मेहरूण याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.