नशिराबादमध्ये तरुणाची आत्महत्या

जळगाव समाचार | २५ मार्च २०२५

नशिराबाद (ता. जळगाव) येथे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. कपिल सुरेश सपकाळे (वय ३२) यांनी शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले.

रविवारी (दि. २३ मार्च) सकाळी कुटुंबीयांना ही घटना समजली. त्यांनी तातडीने कपिल यांना शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here