नशिराबाद येथे महिला डॉक्टरचा विनयभंग ; गुन्हा दाखल…

 

जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५

नशिराबाद येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गोपाळ धनराज पाटील उर्फ करोडपती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.

गोपाळ पाटील हा संबंधित महिला डॉक्टरजवळ येऊन “तु मला आवडतेस, तुझा नंबर दे, माझ्यासोबत बोल” असे म्हणाला. यापूर्वीदेखील त्याने तिचा पाठलाग करत अश्लील प्रस्ताव दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सततचा त्रास सहन न झाल्याने संबंधित महिला डॉक्टरने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी गोपाळ पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here