जळगाव समाचार डेस्क। २४ ऑगस्ट २०२४
नशिराबाद येथील अविनाश सुरेश देवरे (२७) या तरुणाचा शनिवारी रात्री ११ वाजता धावत्या रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना भादली रेल्वे स्टेशनजवळ घडली. अविनाश एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत कामाला होता आणि तो नशिराबाद येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होता.
नेहमीप्रमाणे कामावरून परतत असताना, रेल्वे रूळ ओलांडताना तो अपघाताला बळी पडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. अविनाशच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

![]()




