जळगाव समाचार डेस्क;
उद्यापासून म्हणजेच गुरुवार दि. 4 June पासून ‘नारी शक्ती दूत ॲप’वर (Nari Shaktidoot App) ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. (Mahila Baal Vikas Mantri Aditi Tatkare)
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.