नगराध्यक्षांचा कालावधी आता पाच वर्षे: मंत्रिमंडळाचा निर्णय…

 

जळगाव समाचार डेस्क| १३ ऑगस्ट २०२४

राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्याचे ठरवण्यात आले.
राज्यात २०२१-२२ मध्ये झालेल्या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता. आता, या कालावधीचा विस्तार पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार आहे. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल, म्हणजेच सध्याच्या नगराध्यक्षांनाही या विस्ताराचा लाभ होईल.
या निर्णयामुळे राज्यातील नगरपंचायतींच्या प्रशासनाला अधिक स्थिरता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here