नवविवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशीच केली पतीची हत्या; १५ दिवसांपूर्वीच झाला होता विवाह…


जळगाव समाचार | ११ जून २०२५

सांगलीत वटपौर्णिमेच्या दिवशीच एका नवविवाहित महिलेने किरकोळ वादातून आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिल लोखंडे आणि राधा यांचा विवाह अवघ्या १५ दिवसांपूर्वी, १७ मे रोजी पार पडला होता. नवविवाहित दाम्पत्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हत्येत झाले. वटपौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पत्नी राधा हिला ताब्यात घेतले आहे. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पुढील तपास सुरू आहे. अल्पावधीतच संपलेल्या या वैवाहिक आयुष्यामुळे कुटुंबीयांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here