जळगावात कमल पॅरेडाईज जवळ तरुणाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ…


जळगाव समाचार | ४ मे २०२५

शहरातील हॉटेल कमल पॅराडाइजजवळ एका ३० वर्षीय तरुणाची शनिवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. मयताचे नाव आकाश पंडीत भावसार असून तो अशोक नगर, अयोध्या नगर परिसरात राहत होता.

आकाश ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नीच्या नातेवाईक असलेल्या काही तरुणांनी हॉटेल ए-वन जवळ त्याचा पाठलाग केला आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यात मांडी, छाती आणि गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्यामुळे तो जागीच रक्तबंबाळ झाला.

स्थानिकांनी तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती. मयताच्या पश्चात त्याच्या आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

घटनेनंतर पोलीस अधिकारी संदीप गावीत, बबन आव्हाड आणि रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, चार संशयित तरुणांची नावे समोर आली आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here