Monday, December 23, 2024
Homeक्राईमअडावदच्या खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात , अवघ्या बारा तासात पोलिसांनी लावला...

अडावदच्या खून प्रकरणी दोन संशयित ताब्यात , अवघ्या बारा तासात पोलिसांनी लावला छडा

अडावद, ता. चोपडा   – दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओट्यावर झोपलेल्या तरुणाकडे तंबाखू मागितल्याने झालेल्या वादातून दोघांनी लाकडी दांडा व दगडाने ठेचून तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती .यामुळे परिसरात खळबळ उडाल होती. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या बारा तासात सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे एका अल्पवयीन मुलासह तरुणाला अटक केली आहे.

याप्रकरणी न्यायालयाने तरुणाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तर विधी संघर्ष बालकास बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

अडावद येथील के. टी. नगरच्या मागील भागात सध्या लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन उर्फ गरीब (वय २८, मूळ रा. खर्ची, ता. एरंडोल) यांची लाकडी दांडा व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना १ ऑक्टोंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.होती. या खुनाच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या १२ तासात उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी  रात्री आडगाव येथील वडगाव रोडवरील खालच्या माळीवाडा राहणाऱ्या राज सुरेश महाजन (वय १९) यात अटक केली. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

संशयिताला बुधवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यास २ दिवसांची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकास जळगाव येतील बाल न्यायालयात हजर केले असता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

सर्वाधिक वाचलेल्या...

You cannot copy content of this page