एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव-अमळनेर येथील रहिवासी असलेल्या विकास प्रवीण पाटील या 29 वर्षीय तरुणाला इंडिकेटर तुटल्याच्या कारणावरून बेदम मारहाण करून जीवे ठार केल्याची धक्कादायक घटना 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अमळगाव ते जळोद रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तमाशा पाहण्यासाठी आपल्या मित्रांसोबत विकास पाटील हा तीन नंबर रोजी गेला असता अडीच वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना दुचाकीला कारचा कट लागल्याने यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. त्यामुळे दोन गटांमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दंडका यांचा वापर करून विकास पाटील याला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे ,पोहे कॉ संदीप पाटील ,लक्ष्मण पाटील ,दीपक माळी, प्रवीण मांडोळे नंदलाल पाटील, रवींद्र पाटील ,भगवान पाटील, रणजीत जाधव ,ईश्वर पाटील ,राहुल महाजन, जितेंद्र पाटील ,राहुल कोळी ,विलास गायकवाड ,भारत पाटील यांच्या पथकाने संशयित अमोल कोळी ,नितीन पवार, हर्षल गुरव या तिघांना मेरी मधून तर रोहित पाटील ,मनोज हनुमंत ,श्री गणेश याला पिळोदा येथून अटक केली आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आले आहे.