पोलिसांचे काम आमदारांनी केले; 5 लाखांचा गुटखा पकडून दिला…

 

जळगाव समाचार डेस्क| ६ ऑगस्ट २०२४

मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आणि या अवैध धंद्यावर वारंवार पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. नुकतेच, नाशिक डीआयजी यांच्या पथकाने गुटखा तस्करीवर कारवाई केली होती. तरीसुद्धा हा प्रकार थांबत नाही. अशातच, आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः गुटखा तस्करी करणारे वाहन पकडल्याने या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातून मुक्ताईनगर तालुक्यातून महाराष्ट्रात गुटखा येतो. सोमवारी सकाळी, आमदार चंद्रकांत पाटील चारठाण्याकडे जात असताना, त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी एक संशयास्पद कार अडवली. त्या कारमध्ये अवैध गुटखा असल्याचे आढळले. आमदार पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात होंडा सिटी वाहन क्रमांक एमएच ०२ बीएम ८४२५ आणले. तपासणीत या वाहनात ४ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा सापडला.
या मुद्देमालासह एकूण ७ लाख १३ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हे वाहन मध्य प्रदेशातून भुसावळकडे जात होते. या संदर्भात, मुक्ताईनगर येथील डीवायएसपी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल विजय कचरे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोहम्मद अमीर मोहम्मद हनीफ शेख (रा. खडका रोड, भुसावळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी चौकशी सुरू असून तपासात सर्व माहिती समोर येईल, असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here