मुक्ताईनगर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत माजी सरपंचांचा मृत्यू…

जळगाव समाचार डेस्क | २२ जानेवारी २०२५

मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता झालेल्या अपघातात पिंप्रीपंचम गावातील माजी सरपंच रघुनाथ नाना पाटील (वय ७०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ पाटील हे त्यांच्या दुचाकीने (टीव्हीएस कंपनी, एमएच १९ बीएफ ६८३) मुक्ताईनगरकडे जात होते. दरम्यान, मध्य प्रदेशकडून मुक्ताईनगरच्या दिशेने वेगाने येणाऱ्या कंटेनर (एचआर-३८ एडी ५१०९) ने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. नायगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ झालेल्या या अपघातात कंटेनरचे चाक रघुनाथ पाटील यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी भगवान तुकाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक विजय महेश्वर बैठक (रा. लखनीत पुरमेसपट्टी, ता. उजियारपूर, जि. समस्तीपूर, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास हवालदार लीलाधर भोई करत आहेत. रघुनाथ पाटील यांच्या दुर्दैवी निधनामुळे पिंप्रीपंचम गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here