जळगाव, जळगाव समाचार डेस्क;
जळगाव लोकसभा (Loksabha)मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी मराठी भाषेत शपथ घेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
१८ व्या लोकसभेचे कामकाज कालपासून सुरु झाले असून, प्रथेनुसार सर्वप्रथम निवडून खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्यानंतर संसदेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येऊन लोकसभेचे कामकाज सुरळीत सुरु होते. खासदार स्मिता वाघ यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेतली.