केळीला फळाचा दर्जा मिळावा… खा.स्मिता वाघ यांची संसदेत मागणी..(व्हिडीओ)

 

जळगाव समाचार डेस्क;

जळगांव (Jalgaon) जिल्ह्यातील प्रमुख उत्पन्न असलेल्या केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा अशी मागणी खा.स्मिता वाघ यांनी संसदेत नियम ३७७ द्वारे केली.जिल्ह्यातील तसेच राज्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून केळी पिकाला बघितले जाते ह्या पिकाला फळाचा दर्जा नसल्यामुळे ह्या पिकांच्या उत्पादक शेतकरी वर्गाला निर्यात,शासकीय सवलती,पीक विमा तसेच बाजारभावात मोठ्याप्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली होती.ही मागणी गेल्या बऱ्याच दिवसापासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे खा.स्मिता वाघ यांनी शासनाच्या लक्षात आणून दिले.ह्या पिकाला फळाचा दर्जा मिळाल्यानंतर ह्या केळी उत्पादक शेतकरीवर्गाचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे. तसेच याबाबत लवकरच निर्णय घेण्यात यांवा अशी मागणी खा.वाघ यांनी केली.

व्हिडीओ लिंक

दरम्यान संसदेत जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण कृषी प्रश्नाला वाचा फोडल्याने या मागणीला आता यश येणार असल्याने खा.स्मिता वाघ यांचे केळी उत्पादन परिसरात आभार व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here