जळगाव समाचार | २१ मार्च २०२५
पाचोरा येथे जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांतच मातेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ज्योती चौधरी (३७, रा. बाहेरपुरा, पाचोरा) यांनी लग्नाच्या १६ वर्षांनंतर एका मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
लग्नानंतर १६ वर्षे ज्योती यांनी मातृत्वासाठी उपचार घेतले. अखेर १९ मार्च २०२५ रोजी पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी जुळ्या बाळांना जन्म दिला. कुटुंब आनंदात असतानाच अवघ्या तीन तासांत ज्योतीताईंचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मातृत्वाचा आनंद मिळालेल्या कुटुंबावर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या बाळांसाठी त्यांनी वर्षानुवर्षे संघर्ष केला, त्यांनाच जन्म दिल्यानंतर काही तासांतच त्यांचे छत्र हरपले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

![]()




