जनसंपर्कातून उभे राहिलेले नेतृत्व : आमदार राजू मामा भोळे

 

जळगाव समाचार | ११ जानेवारी २०२५

शहराच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले; मात्र गेल्या काही वर्षांत जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, सर्वपरिचित ‘राजू मामा’. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता वर्षभर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. साधा, डाउन-टू-अर्थ स्वभाव आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याची वृत्ती हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ताकद ठरत आहे.

लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम किंवा शोकसभा—कोणताही प्रोटोकॉल न पाळता थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळणे हे आमदार सुरेश भोळे यांचे वैशिष्ट्य आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाशी ‘वन-टू-वन’ संवाद राखणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आज अनेक नेत्यांचे फोन स्वीय सहाय्यक उचलत असताना, आमदार भोळे यांचा मोबाईल २४ तास सुरू असतो आणि सामान्य नागरिक थेट संपर्क साधू शकतो, ही भावना जळगावकरांमध्ये दृढ झाली आहे.

अलीकडील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जळगाव शहरातून भाजपाला मिळालेल्या मोठ्या मताधिक्याचे श्रेय राजकीय विश्लेषक आमदार सुरेश दामू भोळे यांच्या मजबूत जनसंपर्कालाच देतात. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असले, तरी त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळे भाजपासाठी ही लढत तुलनेने सोपी मानली जात आहे. विकासकामांसोबतच माणसं जोडण्याची कला आत्मसात केलेला हा नेता भविष्यातही जळगावच्या राजकारणाची दिशा ठरवेल, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here