जळगाव : महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून भगवान नगर भागात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पूर्ण गल्लीमध्ये सडा-समार्जन करून रांगोळ्या व फुलांच्या पाकळ्यांनी मार्ग सुशोभीत करण्यात आला होता. सोमवारी सकाळी भूषण कॉलनी येथील काशी विश्वेश्वर मंदिर येथे पूजा करून पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून कोल्हे नगर, मुंदडा नगर, रामानंदनगर, वाघ नगर परिसरात प्रचार रॅलीचा समारोप झाला. मार्गात प्रथम महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्ष सिंधुताई कोल्हे, वसंतराव कोल्हे यांच्या घरी भेट देऊन ज्येष्ठांचे आमदार भोळे यांनी आशीर्वाद घेतले.
माजी महापौर ललित कोल्हे
यांच्या घरी सरिताताई माळी यांनी काढलेली ‘विश्वास जुना, राजूमामा पुन्हा’ ही रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. रॅलीच्या शेवटी वाघ नगर परिसरात माजी नगरसेविका उपाताई संतोष पाटील यांच्या घरी भेटी दिल्यानंतर झाला.
मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश आ. राजुमामा यांच्या नेतृत्त्वावर ठेवाला विश्वास ठेवून ठेऊन मनसेचे विभाग प्रमुख हर्षल माहाडीक, दर्शन पाटील, पंकज पाटील,
मयुर पाटील, दुर्गेश पाटील, आदीनाथ जाधव, कल्पेश पवार, ज्ञानेश्वर भोई, अनुराग तरटे, मनोज कुमार, सागर पाटील, त्रिशुल कोळी, राहुल बढे, सचिन परदेशी, दीपक पाटील, विशाल सपकाळे, मुकेश कोळी, प्रितम सपकाळे, लकी कोळी, हर्षल इंगळे, गणेश सोनवणे, सुरज लोहार, पवन पाटील, राहुल पाटील, बादल साबळे आदी ८० कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.