जळगाव समाचार | २१ मार्च २०२५
जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मीनल करणवाल यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्या नांदेड येथे कार्यरत होत्या. त्यांनी अंकित यांची जागा घेतली असून, त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे.
गुरुवारी (दि. 20 मार्च) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर श्रीमती करणवाल यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाच्या योजनांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेचे काम अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.