जळगाव समाचार डेस्क;
जळगाव (Jalgaon) शहरातील एमआयडीसी परिसरातील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीतून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाल्याची घटना दि. २० जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी हि चोरी करणारे ज्ञानेश्वर रतन सोनार (२५) व विनोद गोपाळ मोरे (२२) तर पाईप विकत घेणाऱ्या शेख सईद रफिक शहा (५३), रा. रजा कॉलनी याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दि. २० जुलै रोजी शहरातील एमआयडीसी येथील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीमधून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी ज्ञानेश्वर सोनार, गोपाळ मोरे यांनी अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार कारवाई करत पथकाने अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी आपली खाकी दाखवत त्यांची चौकशी केली असता, त्या दोघांनी चोरलेले तांब्याची पाईपलाईन रामनगरातील भंगार व्यावसायीक शेख सईद रफिक शहा याला विकल्याचे कबुल केले. त्यांच्या कबुलीनुसार पोलिसांनी भंगार व्यावयीकाला तत्काळ अटक करत त्याच्याकडून चोरलेले पाईप हस्तगत केले. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललित नारखेडे, किरण पाटील, छगन तायडे यांच्या पथकाने केली.

![]()




