जळगाव समाचार डेस्क | ३० डिसेंबर २०२४
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सिद्धिविनायक इंडस्ट्रीज या चटई कंपनीला आग लागली. सुरुवातीला सुरक्षारक्षकाच्या खोलीत आग लागली, ज्यामुळे चटई आणि प्लास्टिक दाण्यांचा कच्चा माल असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली.
आग विझवण्यासाठी जळगाव अग्निशमन दलाचे ४ ते ५ बंब दाखल झाले होते, परंतु अजूनही आग आटोक्यात आणण्यात यश येत नव्हते. तितक्त काही वेळातच गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने तीव्रस्वरूप धारण केले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, आणि इतर अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या जि.एम. फाउंडेशनचे पितांबर भावसार रुग्णवाहिका घेऊन तिथे पोहोचले. प्रशासनातर्फे आग लागण्याच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.