प्रवासी बस दरीत कोसळली; 3 गंभीर…

 

अमरावती, जळगाव समाचार डेस्क;

अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25-30 प्रवास्यांना घेऊन जाणरी खाजगी प्रवासी बस (Bus) मेळघाट (Melghat) परिसरात दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. (Accident) यात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या हाय पॉइंटजवळ अकोटवरून धारणी येथे जात असलेल्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. दरम्यान ही बस थेट दरीत जाऊन कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच अकोटवरुन एकलव्य बचावपथक आणि रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी रवाना झाले. या पथकाने प्रवाशांना दरीतून काढण्याचे काम केले. तसेच या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात 22 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here